Weather Update : सावधान…जळगाव जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी; दक्षतेचा इशारा !
Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा पडत आहे. आज सोमवारी (ता. २ सप्टेंबर) विदर्भातील अमरावती जिल्ह्यात हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) जारी केला आहे. या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Weather Update : Caution… Orange alert issued for heavy rain for Jalgaon district; Warning!
अरबी समुद्रातील ‘असना’ चक्रीवादळ ओमानकडे सरकत आहे आणि त्याची तीव्रता आता ओसरण्याच्या मार्गावर आहे. हे चक्रीवादळ आता आपला प्रभाव कमी करत असून, यामुळे समुद्रकिनारी भागांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आणि उत्तर आंध्र प्रदेशात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. या प्रणालीचा प्रभाव विदर्भाकडे सरकताना हळूहळू कमी होईल. मॉनसूनचा आस आता त्याच्या सर्वसाधारण स्थितीकडे परतेल, अशी हवामान विभागाची माहिती आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय झाले आहे. या परिस्थितीमुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाची शक्यता वाढली आहे. हळूहळू राज्यभरात पावसाच्या सरींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेला जिल्हानिहाय पावसाचा इशारा
■ मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : अमरावती.
■ जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : जळगाव, छत्रपती संभाजीनगर.
■ जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, सातारा, कोल्हापूर, जालना, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर.
■ विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.