उत्तर महाराष्ट्रात मालेगावचे कमाल तापमान 40 अंशावर, उष्णतेचा तडाका वाढला
Weather Update : उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात कमाल तापमानात हळूहळू वाढ होत असून, उष्णतेचा तडाका वाढल्याने जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. दरम्यान, शनिवारी (ता.24) मालेगावमध्ये 40.6, अकोल्यात 40.4 आणि यवतमाळमध्ये 40.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली. उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्येही 37 ते 39 अंशाच्या दरम्यान कमाल तापमान होते.
रविवारी (ता.24 मार्च) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 39.7, अहमदनगर- 36.8, कोल्हापूर- 36.7, महाबळेश्वर- 31.4, मालेगाव- 40.6, नाशिक- 37.3, पुणे- 37.7, सांगली- 38.0, सातारा- 37.2, सोलापूर- 39.7, अकोला- 40.4, अमरावती- 39.0, बुलडाणा- 37.2, चंद्रपूर- 38.0, गडचिरोली- 36.0, गोंदिया- 36.7, नागपूर- 38.2, वर्धा- 39.9, वाशिम- 39.6, यवतमाळ- 40.5, छत्रपती संभाजीनगर- 37.8, बीड- 38.5, नांदेड- 38.4, परभणी- 39.1, डहाणू- 33.3, मुंबई- 31.0, रत्नागिरी- 32.5