उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे जाण्याची चिन्हे, सूर्य आग ओकू लागला
Weather Update : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा लवकरच 40 अंशाच्या पुढे जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सूर्य आग ओकू लागल्यानंतर उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी बाहेर पडणेही आता मुश्किल होऊ लागले आहे. दरम्यान, काही ठिकाणी पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे दमटपणा वाढून अंगातून घामाच्या धारा निघाल्या आहेत. दुसरीकडे रब्बी पिकांची काढणी करण्यासाठी शेतकरी भर उन्हात जीवाचे रान करताना दिसत आहेत.
शुकवारी (ता.22 मार्च) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 37.6/19.8, अहमदनगर- 35.8/13.7, कोल्हापूर- 36.8/23.1, महाबळेश्वर- 31.4/18.3, मालेगाव- 39.2/19.0, नाशिक- 36.3/16.8, पुणे- 37.2/18.5, सांगली- 36.3/22.8, सातारा- 36.0/20.8, सोलापूर- 37.4/22.4, अकोला- 38.0/19.1, अमरावती- 36.0/19.0, बुलडाणा- 35.5/19.8, चंद्रपूर- 36.4/18.6, गडचिरोली- 34.6/18.0, गोंदिया- 33.8/18.4, नागपूर- 35.0/18.6, वर्धा- 36.1/19.2, वाशिम- 38.4/17.2, यवतमाळ- 38.0/21.5, छत्रपती संभाजीनगर- 35.5/20.4, बीड- 36.0/20.0, नांदेड- 36.8/22.0, परभणी- 37.1/19.6, डहाण- 35.6/20.1, मुंबई- 36.3/24.3, रत्नागिरी- 35.0/24.5