जळगाव, नाशिक जिल्ह्यात रात्री थंडीचा गारठा आणि दिवसा उन्हाचे चटके
Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले अवकाळी पावसाचे ढग आता निवळले आहेत. अपवाद वगळता बऱ्याच जिल्ह्यातील कमाल तापमान हे 35 ते 36 अंशाच्या पुढे गेले आहे, किमान तापमानातही बरीच वाढ झाली आहे. काही ठिकाणचे कमाल तापमान हे सुमारे 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची चिन्हे दिसून आली आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मात्र रात्री थंडीचा गारठा आणि दिवसा उन्हाचे चटके, असे वातावरण सध्या आहे.
रविवारी (ता.10 मार्च) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 36.0/13.5, कोल्हापूर- 36.7/21.3, महाबळेश्वर- 31.1/18.4, मालेगाव- 38.0/16.8, नाशिक- 34.6/13.2, सांगली- 37.7/20.1, सातारा- 36.5/18.0, सोलापूर- 39.4/22.4, अकोला- 37.1/18.5, अमरावती- 36.0/20.3, बुलडाणा- 35.4/19.0, चंद्रपूर- 38.2/19.0, गडचिरोली- 36.0/19.4, गोंदिया- 34.3/18.2, नागपूर- 35.2/18.4, वर्धा- 37.0/19.6, वाशीम- 36.8/16.8, यवतमाळ- 38.5/21.0, छत्रपती संभाजीनगर- 34.8/17.1, नांदेड- 36.8/20.2, परभणी- 36.6/19.5, डहाणू- 31.9/17.9, मुंबई- 31.7/22.0, रत्नागिरी- 36.4/19.5