राज्यात अवकाळीचे ढग निवळताच कमाल तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला
Weather Update : राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे ढग निवळल्यानंतर कमाल तापमानाचा पारा आता वाढला आहे. अपवाद वगळता बऱ्याच जिल्ह्यातील कमाल तापमान हे 35 अंशाच्या पुढे गेले आहे. शनिवारी (ता.02) यवतमाळमध्ये उच्चांकी 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाशीम, चंद्रपूर, अकोला, मालेगावातही तापमानाचा पारा जास्तच होता.
रविवारी (ता. 03 मार्च) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 35.0, अहमदनगर- 34.9, जेऊर- 37.5, कोल्हापूर- 34.8, महाबळेश्वर- 28.4, मालेगाव- 37.6, नाशिक- 32.6, पुणे- 34.2, सांगली- 35.7, सातारा- 34.4, सोलापूर- 37.8, अकोला- 36.0, अमरावती- 34.2, बुलडाणा- 34.5, ब्रम्हपुरी- 35.7, चंद्रपूर- 37.2, गडचिरोली- 35.0, गोंदिया- 31.5, नागपूर- 31.6, वर्धा- 33.8, वाशीम- 37.0, यवतमाळ- 39.5, छत्रपती संभाजीनगर- 33.4, नांदेड- 35.8, परभणी- 37.0, उदगीर- 35.8, डहाणू- 31.7, मुंबई- 30.3, रत्नागिरी- 32.2