उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आजही वादळी पाऊस तसेच गारपिटीचा इशारा
Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळी राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ व मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. आज शनिवारी (ता. 02) देखील उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, सकाळी गारठा तसेच दुपारी उन्हाचा चटका आणि सायंकाळी पावसाच्या सरी, असे वातावरण सध्या राज्यभर पाहण्यास मिळत आहे.
शनिवारी (ता. 02 मार्च) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 37.8/18.0, अहमदनगर- 35.9/19.5, कोल्हापूर- 35.1/20.8, महाबळेश्वर- 29.1/17.2, मालेगाव- 37.0/20.0, नाशिक- 34.2/16.9, पुणे- 36.1/17.7, सांगली- 35.9/21.0, सातारा- 35.9/20.0, सोलापूर- 38.0/24.4, छत्रपती संभाजीनगर- 34.5/20.8, परभणी- 37.3/23.4, डहाणू- 31.4/21.2, मुंबई- 31.2/22.7, रत्नागिरी- 33.8/21.4, अकोला- 37.9/21.0, अमरावती- 36.6/21.3, बुलडाणा- 35.5/20.0, चंद्रपूर- 37.0/20.2, गडचिरोली- 34.8/19.0, गोंदिया- 35.4/21.2, नागपूर- 37.2/22.5, वर्धा- 37.6/23.4, वाशीम- 38.2/20.2, यवतमाळ- 39.5/22.0