Weather Update : राज्यात आज सर्वदूर पावसाचा अंदाज; जळगाव जिल्ह्याची कशी आहे स्थिती ?
Weather Update : मॉन्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसासाठी अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. आज (ता.३) राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता आहे, उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Weather Update: Forecast of rain in all parts of the state today; How will the situation be in Jalgaon district?
पावसासाठी अनुकूल हवामान असल्यामुळे आज (ता.३) पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाकडून जिल्हानिहाय देण्यात आलेला पावसाचा इशारा
पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अ.नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.