Weather Update : राज्यभर आजही मुसळधार पावसाचा इशारा; जळगावमध्ये कशी राहिली स्थिती ?
Weather Update : हवामान विभागाकडून राज्यात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भ या भागांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
Weather Update: Warning of heavy rains across the state today; How was the situation in Jalgaon?
हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असून प्रशासनाने त्याबाबत तयारी ठेवावी, असा इशाराही देण्यात आला आहे. या पावसामुळे जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्गाने आपल्या पिकांची रोगराईपासून काळजी घ्यावी आणि पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे कृषी विभागाने सुचविले आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी गरज नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच आपत्कालीन स्थितीत त्वरित मदत मिळविण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जोरदार पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, कोल्हापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.