जोर वाढणार…जळगावसह धुळे जिल्ह्यात आज रविवारी वादळी पावसाचा इशारा !

जळगाव टुडे । राज्यभरात काही दिवसांपासून मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत असताना, हवामान खात्याने आज रविवारी (ता.०७) देखील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच धुळे, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ( Weather Update )

Weather Update
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात सध्या चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय गुजरात ते केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर देखील ढगांची गर्दी होऊ लागली आहे. आज रविवारी (ता. ७) सुद्धा राज्यात पाऊस सक्रिय होण्याचे संकेत आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, पावसाचे अधुनमधून आगमन होत असल्याने राज्याच्या बऱ्याच भागात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. तुरळक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्याच्या स्थितीत खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. दुसरीकडे जमिनीची तहान भागलेली नसल्याने शेती शिवारातील ओढे व नाले अजुनही खळाळताना दिसलेले नाहीत. परिणामी, नद्यांनाही पाणी आलेले नाही. ठिकठिकाणच्या सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा अद्याप होऊ शकलेला नाही. ( Weather Update )

WhatsApp Group

Related Articles

Back to top button