सावधान…जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी आज ‘असा’ आहे पावसाचा अंदाज !

जळगाव टुडे । हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, रविवारी (ता.२३) रात्री उशिरा राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सोमवारी (ता.२४) देखील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज तसेच येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ( Weather Update )

खान्देशातील जळगावसह धुळे, नंदुरबार तसेच नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ, मुंबई, ठाणे, आदी जिल्ह्यांसाठी देखील आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सूनची वाटचाल मंदावल्याने राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजुनही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही भागात पाऊस पडण्याच्याआशेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली होती. त्यांना पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागली आहे. सुदैवाने आता उशिरा का होईना पावसाच्या आगमनाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button