राज्यात आज बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज; जळगावची कशी राहील स्थिती ?
जळगाव । पोषक स्थितीअभावी मान्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण झालेला असला, तरी राज्याच्या बऱ्याच भागात अधुनमधून पावसाची हजेरी लागताना दिसली आहे. आज बुधवारी (ता.19) देखील राज्याच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. ( Weather Update )
हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आज बुधवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित भागात आज दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण कायम राहील. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळतील. सध्या राज्यात मान्सूनची वाटचाल काहीशी मंदावली आहे, त्यामुळे बऱ्याच भागात पावसाला पाहिजे तसा जोर नसून, शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे. मात्र, हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज बुधवारपासून राज्यभर मान्सुनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारण शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची परिस्थिती बऱ्याच भागात राहू शकेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.