राज्यात बुधवारपासून चांगल्या पावसाचा अंदाज; जळगावची स्थिती कशी राहील ?

जळगाव टुडे । सध्याच्या घडीला राज्यात मान्सूनची वाटचाल काहीशी मंदावली आहे, त्यामुळे बऱ्याच भागात पावसाला पाहिजे तसा जोर दिसून आलेला नाही. शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. मात्र, हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बुधवार (ता.१८) पासून राज्यभर मान्सुनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारण शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची परिस्थिती बऱ्याच भागात राहू शकेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather Update)

हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ढग जमा होऊन पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होईल. मान्सुनचे वारे उत्तर भारताकडे वेगाने वाहू लागतील. सध्या मॉन्सूनने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला दिसत आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच पश्चिम विदर्भात दिवसाच्या कमाल तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे.

आज मंगळवारी (ता.18) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमान हे ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ४६ टक्के राहील. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहून दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यात मंगळवारी (ता.18) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासात पडलेला पाऊस (मिलीमीटर)
जळगाव- 7.2, जेऊर- 2.2, महाबळेश्वर- 2.3, नाशिक- 20.4, सांगली- 3.2, सोलापूर- 11.5, अकोला- 2.8, बुलडाणा- 3.0, नागपूर- 19.0, वर्धा- 13.4, यवतमाळ- 4.0, डहाणू- 7.3, मुंबई- 13.0, रत्नागिरी- 10.4

WhatsApp Group

Related Articles

Back to top button