विदर्भात उष्णतेची लाट…ब्रम्हपुरीत सर्वाधिक 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद !
जळगाव टुडे । हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान 45 अंशापर्यंत गेले आहे. विशेषतः ब्रह्मपुरीत सर्वाधिक 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरमध्येही 45.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे सजीव सृष्टी चांगलीच होरपळून निघाली आहे. आज गुरुवारी (ता.30) देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)
गुरुवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
अकोला- 42.6, अमरावती- 43.8, भंडारा- 45.0, बुलडाणा- 38.2, ब्रम्हपुरी- 46.7, चंद्रपूर- 44.2, गडचिरोली- 44.0, गोंदीया- 44.0, नागपूर- 45.2, वर्धा- 45.0, वाशीम- 42.6, यवतमाळ- 44.0, जळगाव- 42.0, जेऊर- 40.5, मालेगाव- 41.8, नाशिक- 35.3. सोलापूर- 39.8, छत्रपती संभाजीनगर- 40.0, बीड- 41.7, नांदेड- 42.8, परभणी- 42.0, उदगीर- 41.2, धाराशिव- 39.3, अलिबाग- 38.0, डहाणू- 36.0, मुंबई- 35.3, रत्नागिरी- 33.6