नााशिकसह अहमदनगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यात आज वादळी पाऊस पडण्याचा इशारा
Weather Update : कोकणासह मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज गुरूवारी (ता. 29) नााशिक, अहमदनगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, वातावरणातील उकाडा वाढल्याने थंडी आता गायब झाली आहे. किमान व कमाल तापमानात देखील बरीच वाढ झाली आहे.
गुरूवारी (ता. 29 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 35.4/17.8, अहमदनगर- 34.0/21.4, कोल्हापूर- 35.4/23.0, महाबळेश्वर- 28.9/17.0, मालेगाव- 35.6/19.0, नाशिक- 35.4/17.4, पुणे- 35.1/18.4, सांगली- 36.3/24.0, सातारा- 35.2/21.4, सोलापूर- 37.6/23.8, छत्रपती संभाजीनगर- 34.3/18.8, नांदेड- 34.8/21.2, परभणी- 34.9/20.3, डहाणू- 31.0/21.7, मुंबई- 32.0/23.5, रत्नागिरी- 35.3/24.0