जळगावसह धुळे जिल्ह्यात आजपासून पुढचे तीन दिवस गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा

जळगाव टुडे । राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, आजपासून पुढचे तीन दिवस जळगावसह धुळे जिल्ह्यात तसेच नाशिक, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली, धाराशिवमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे कमाल तापमानात घट झालेली असली तरी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Weather Update)

नाशिक तसेच पुण्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान 31-35 अंश सेल्सिअसदरम्यान असेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी वीज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज रविवारी (12 मे) रोजी कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांनाही हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय उद्या सोमवारी (ता.13) नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button