विदर्भासह मराठवाड्यात आज गुरूवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता

Jalgaon Today : राज्यात बऱ्याच भागात कमाल तापमानाचा पारा हा 44 अंशापर्यंत गेला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत देखील झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज गुरूवारी (ता.02) मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय जालना, नांदेड, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update)

Chance of unseasonal rain with lightning in Vidarbha and Marathwada today

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दिवसाचे कमाल तापमान हे आता 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सकाळी दहा वाजेपासूनच सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखील आता मुश्किल होऊन बसले आहे. अनेकांना तीव्र उन्हाचा फटका बसल्याने उष्माघाताचा त्रास देखील सहन करावा लागला आहे. दरम्यान, सध्याची उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल. शिवाय पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button