राज्यात पुढील 24 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज
Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरुपाच्या पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात व कोकणात रिमझिम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील 24 तासातही राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे तापमानाचा पारा 40 अंशाकडे झेपावल्याने उन्हाचा चटका सुद्धा तितकाच वाढला आहे.
सोमवारी (ता.01 एप्रिल) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 40.0, कोल्हापूर- 37.6, मालेगाव- 39.4, नाशिक- 37.6, सांगली- 39.4, सातारा- 37.7, सोलापूर- 41.0, अकोला- 40.2, अमरावती- 39.4, बुलडाणा- 38.6, चंद्रपूर- 40.2, गडचिरोली- 37.4, गोंदिया- 38.2, नागपूर- 37.2, वर्धा- 39.0, वाशिम- 41.2, यवतमाळ- 39.5, छत्रपती संभाजीनगर- 38.4, बीड- 40.0, परभणी- 36.5, उदगीर- 39.0, डहाणू- 33.4, मुंबई- 31.8, रत्नागिरी- 33.5