जळगावच्या तापमानाचा पार 45.0 अंशाच्या पुढेच, उष्णतेच्या झळांनी सजीव सृष्टी होरपळली
जळगाव टुडे । हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा गेल्या काही दिवसांपासून 45 अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, उष्णतेच्या झळांनी सजीव सृष्टी होरपळली आहे. दरम्यान, तापमान वाढीच्या संकटासोबतच वातावरणातील उकाडा देखील आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्री दहा वाजेपर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा उष्ण वारे वाहत असल्याने घराबाहेर पडणे दिवसेंदिवस मुश्किल होत आहे. जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. (Weather Alert)
बुधवारी (ता.22) दिवसभरात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 45.3, मालेगाव- 43.2, नाशिक- 42.0, सोलापूर- 40.8, अहमदनगर- 41.0, पुणे- 38.9, अकोला- 44.8, अमरावती- 43.4, बुलडाणा- 40.5, ब्रम्हपुरी- 43.2, चंद्रपूर- 42.2, गडचिरोली- 42.2, नागपूर- 41.2, वर्धा- 42.9, वाशीम- 40.2, यवतमाळ- 42.7, छत्रपती संभाजीनगर- 41.4, बीड- 43.1, नांदेड- 41.2, परभणी- 43.4, उदगीर- 40.1