जळगाव @45.2 अंश सेल्सिअस….उत्तर महाराष्ट्रात आज बुधवारी पुन्हा उष्ण लाटेचा इशारा
जळगाव टुडे । हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा सतत वाढत जाणार असल्याचे म्हटले आहे. दररोज एक अंशाने वाढत जाणारे तापमान 23 मे पर्यंत सुमारे 47 अंशापर्यंत पोहोचू शकते, असेही स्कायमेट संस्थेने नमूद केले आहे. प्रत्यक्षात मंगळवारी (ता.21) जिल्ह्याचे कमाल तापमान हे 45.2 अंश सेल्सिअसपर्यंत गेले देखील होते. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात आज बुधवारी पुन्हा उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Alert)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.21) जळगावमध्ये 45.2, मालेगावमध्ये 43.0, नाशिकमध्ये 41.8, नगरमध्ये 41.0, पुण्यात 40.6, सोलापुरात 41.5, अकोल्यात 44.0, अमरावतीत 43.2, भंडाऱ्यात 40.2, बुलडाण्यात 41.3, ब्रम्हपुरीत 43.3, चंद्रपुरात 42.8, गडचिरोलीत 41.4, वर्ध्यात 43.1, यवतमाळमध्ये 42.0, छत्रपती संभाजीनगरात 41.6, बीडमध्ये 43.3, नांदेडमध्ये 40.8, परभणीत 41.7, धाराशीवमध्ये 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.