जळगावमध्ये उच्चांकी 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, सावधनेता इशारा !
जळगाव टुडे । जिल्ह्यातील तापमान अपवाद वगळता गेल्या महिनाभरापासून 42 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्तच राहिले आहे. तशात हवामान विभागाने आगामी पाच दिवसात जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात सोमवारी (ता.20) राज्यातील उच्चांकी 43.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Alert)
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रविवार (ता.19) पासूनच तापमानाचा पारा सतत वाढत जाणार असल्याचे म्हटले आहे. दररोज एक अंशाने वाढत जाणारे तापमान 23 मे पर्यंत सुमारे 47 अंशापर्यंत पोहोचू शकते, असे स्कायमेट संस्थेने देखील नमूद केले आहे. त्यामुळे आगामी पाच दिवस खूपच सावधानीचे आणि काळजीचे असणार आहेत.
मंगळवारी (ता.21) सकाळी साडेआठपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
जळगाव- 43.9, नाशिक- 40.5, सोलापूर- 40.4, जेऊर- 40.0, सातारा- 37.8, सांगली- 36.2, अकोला- 43.8, अमरावती- 42.8, बुलडाणा- 41.5, चंद्रपूर- 42.0, वर्धा- 41.8, वाशिम- 40.6, यवतमाळ- 42.2, छत्रपती संभाजीनगर- 40.8, बीड- 41.5, नांदेड- 40.6, परभणी- 40.5,