Viral News : भारतात असेही एक रेल्वे स्टेशन आहे, भुताच्या धाकामुळे जे तब्बल ४२ वर्षे बंदच होते !

Viral News : एखादे रेल्वे स्टेशन पुरेशी प्रवासी संख्या उपलब्ध नसते म्हणून बंद पडल्याचे आपण बऱ्याचवेळा ऐकतो. पण भुताची बाधा झाल्याने एखादे रेल्वे स्टेशन बंद पडल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतात असेही एक रेल्वे स्टेशन आहे जे तब्बल ४२ वर्षे भुताच्या धाकामुळे बंद अवस्थेत होते. त्याचे नाव बेगुनकोडोर आहे आणि ते पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात आहे.

Viral News: There is also a railway station in India, which was closed for 42 years due to the ghost of a girl!

बेगुनाकोडोर रेल्वे स्टेशनचे १९६० मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. हे स्टेशन सुरू होण्यामागे संथालची राणी श्रीमती लचन कुमारी यांची महत्त्वाची भूमिका होती. त्या काळात हे स्टेशन गावकऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले होते. सुरूवातीला काही वर्षे हे स्थानक सुरळीतपणे कार्यरत होते, पण नंतर तिथे विचित्र घटना घडू लागल्या. १९६७ मध्ये या स्टेशनवर धक्कादायक घटना घडली. एका रेल्वे कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका मुलीचे भूत पाहिल्याचा दावा केला. या घटनेनंतर स्टेशनवर भीतीचे वातावरण निर्माण झाले. अफवा पसरल्या की, रेल्वे अपघातात तिचा मृत्यू झाला होता. कर्मचाऱ्याने दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती लोकांना दिली, परंतु बहुतेकांनी त्याच्या बोलण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले.

स्टेशन मास्तर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय रेल्वे क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळले

१९६७ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने तरूणीचे भूत पाहिल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या बोलण्यावर कोणी फार विश्वास ठेवला नाही. पण भयंकर कथा तेव्हाच सुरू झाली, जेव्हा बेगुनाकोडोरचे तत्कालीन स्टेशन मास्तर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय रेल्वे क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळले. स्टेशन मास्तरच्या कुटुंबाला संपविण्यामागे मुलीचेच भूत कारणीभूत असल्याचा दावा स्थानिक लोकांनी केला. या घटनेनंतर रेल्वे स्थानकाच्या भोवती भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक लोक असे सांगू लागले की, सूर्यास्तानंतर जेव्हा केव्हा एखादी ट्रेन बेगुनाकोडोर स्थानकावरून जायची, तेव्हा त्या महिलेचे भूत तिच्यासोबत धावू लागायचे आणि कधी-कधी ते रेल्वेपेक्षा जास्त वेगाने धावून तिला मागे टाकायचे. हे दृश्य अस्वस्थ करणारे आणि भयावह होते. याशिवाय, अनेकवेळा ते भूत रेल्वे समोरच्या रुळांवर नृत्य करताना दिसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.अखेर बेगुनाकोडोर रेल्वे स्थानकाला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गाडीतील प्रवासी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करायचे

बेगुनाकोडोर स्टेशनच्या या कहाण्या रेल्वेच्या नोंदींमध्ये देखील नमूद आहेत, ज्यामुळे ते भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक अद्वितीय आणि रहस्यमय ठिकाण बनले आहे. या ठिकाणाचे भयावह आणि झपाटलेले स्वरूप आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. स्टेशन मास्तर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा रहस्यमय मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लोकांमध्ये या भुताची भीती इतकी वाढली की त्यांनी या स्थानकावर येण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. हळूहळू इथून लोकांची ये-जा थांबली आणि प्रवाशांची संख्या कमी होत गेली. रेल्वे कर्मचारी देखील या भयावह वातावरणामुळे घाबरले होते. त्यांनी आपली नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर गाड्या थांबवणे बंद केले कारण ना कोणी प्रवाशी येथे उतरू इच्छित होते ना कोणी या स्थानकावरून ट्रेनमध्ये चढण्यास तयार होते. असेही म्हटले जाते की, त्या वेळी या स्थानकावरून जेव्हाही रेल्वे जात असे, तेव्हा लोको पायलट स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेनचा वेग वाढवत असे, जेणेकरून ती लवकरात लवकर हे स्थानक ओलांडू शकेल. गाडीमध्ये बसलेले लोक देखील स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करायचे. मात्र, ४२ वर्षांनंतर म्हणजेच २००९ मध्ये ग्रामस्थांच्या विनंतीवरून तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा या स्थानकाचे उद्घाटन केले. तेव्हापासून या स्थानकावर भूत दिसल्याचा दावा केला जात नसला तरी सूर्यास्तानंतरही लोक स्टेशनवर थांबत नाहीत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button