Viral News : ऐकावे ते नवलच; नैसर्गिक आपत्ती थांबविण्यासाठी एका गावात बांधले जात आहे चक्क एलियनचे मंदिर !

Viral News : आपल्या देशात देवी-देवतांच्या मंदिरांची कमी नाही. कुठेही जा तुम्हाला श्रद्धाळू भाविकांकडून लहान व मोठ्या मंदिरांची उभारणी केल्याचे दिसून येते. त्यानंतर आता तर थेट परग्रहावरील एलियनचे मंदिर एके ठिकाणी उभारले जात आहे, ज्याची सगळीकडे चर्चा देखील सुरू आहे. संपर्ण देशात नैसर्गिक आपत्तीने कहर केला आहे आणि ही आपत्ती फक्त एलियन थांबवू शकतो, अशी भावना असलेल्या व्यक्तीने हे मंदिर उभारण्याचा चंग बांधला आहे. जगावेगळ्या अशा मंदिराचे काम आता प्रगतीपथावर देखील आहे.

It is surprising to hear; ‘He’ is building a temple of aliens to stop natural disasters!

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील मल्लमुपंबत्ती गावात ही अद्वितीय घटना घडत आहे. लोगनाथन नावाचे एक व्यक्ती आपल्या गावात एलियनचे मंदिर बांधत आहेत. एलियनविषयी आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण एलियनचे मंदिर बांधल्याचे प्रथमच ऐकले असेल. लोगनाथन यांचे म्हणणे आहे की, जगात नैसर्गिक आपत्ती सतत वाढत आहेत आणि या संकटांना थांबवण्याची ताकद केवळ एलियनमध्ये आहे. त्यांना विश्वास आहे की एलियनची पूजा केल्याने नैसर्गिक आपत्ती थांबवता येतील आणि त्यामुळे त्यांनी एलियनचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

एलियनच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत

लोगनाथन या मंदिरात दररोज एलियनची पूजा करतात. त्यांच्या मते, एलियन हे अतिमानवीय शक्ती असलेले आहेत आणि त्यांची कृपा लाभल्यास मानव जातीला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळू शकते. मंदिराची उभारणी अजूनही सुरू आहे आणि येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मल्लमुपंबत्ती गावात सन २०२१ पासून येथे एलियनचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. हे मंदिर लोगनाथन नामक व्यक्तीच्या गुरुसिद्ध भाग्य यांच्या जीवनसमाधीजवळ बांधण्यात येत आहे. जगभरात एलियनचे मंदिर बांधल्याचे पहिलेच उदाहरण असल्याने या मंदिराच्या दर्शनासाठी दूरदूरहून लोक येत आहेत.

एलियनशी बोलूनच हे मंदिर बांधण्याची मिळवली परवानगी ?

लोगनाथन यांच्या म्हणण्यानुसार, परग्रहवासीयांसाठी आजपर्यंत कुठेही मंदिर बांधलेले गेलेले नाही आहे. त्यांना विश्वास आहे की, या मंदिरामुळे एलियन आपल्या इच्छा पूर्ण करतील. एवढेच नव्हे तर लोगनाथन यांनी असा दावा केला आहे की, ते चक्क एलियनशी संवाद साधतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी एलियनशी बोलूनच हे मंदिर बांधण्याची परवानगी मिळवली आहे. विशेष म्हणजे या मंदिरात भगवान शिव, माता पार्वती, माता काली आणि भगवान मुरुगन यांसारख्या देवतांच्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button