Viral News : घरात झोपलेल्या महिलेच्या केसांमध्ये शिरला अचानक साप; त्यानंतर घडला भयंकर प्रकार !
Viral News : पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र पाणी साचल्यामुळे तसेच गवत उगवल्याने साप निघण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. साप हा एक असा प्राणी आहे, ज्याला पाहताच अनेकांचे शरीर थरथर कापते. त्याचा विषारी स्वभाव आणि अचानक हल्ला करण्याची प्रवृत्ती यामुळे तो मानवासाठी नेहमीच धोकादायक ठरतो. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Viral News : A snake suddenly entered the hair of a woman who was sleeping at home; Then a terrible thing happened!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक महिला घरात निश्चिंतपणे झोपली आहे. पण, अचानक एक धक्कादायक दृश्य समोर येते. तिच्या केसांमध्ये एक साप सरसर घुसतो. साप हळूहळू तिच्या केसांमध्ये खोलवर जाऊ लागतो. घरातच घडलेली ही घटना पाहून प्रत्येकालाच धडकी भरते. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. @kashikyatra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांत 2.1 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओत एक महिला झोपली असताना तिच्या केसांत साप शिरताना स्पष्टपणे दिसत आहे.
सापाचे पुढे झाले तरी काय ?
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या सापाची ओळख प्राणघातक म्हणून केली आहे तर काही जणांनी साप नेहमी धोकादायक नसतो, असे म्हटले आहे. या व्हिडिओमुळे अनेकजण घाबरले आहेत आणि त्यांनी आपल्या भावना कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. या घटनेनंतर सापाचे काय झाले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडिओ खरा आहे की बनावट, याबाबतही अनेकांना शंका आहे.
दरम्यान, सापांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आपण पावसाळ्यात सावध राहणे आवश्यक आहे. काळजी घेऊन आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सापांपासून सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे घराभोवती स्वच्छता ठेवा. जुने बूट घालण्यापूर्वी त्यांचे तळवे चेक करा. रात्री झोपताना खिडकी-दरवाजे व्यवस्थित बंद ठेवा. सापांबद्दल जागरूक रहा.