Vidhansabha Election : राज्यात ‘या’ दिवसापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता…!
Vidhansabha Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू होण्याबाबत चर्चा सुरू असली तरी निवडणूक आयोग त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
Vidhansabha Election : Code of Conduct for Vidhansabha Elections is likely to be implemented in the state from ‘this’ day…!
राज्यात विधानसभा निवडणुकीची संभाव्य घोषणा होण्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांमध्ये उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही सरकारी योजना किंवा कामांचे उद्घाटन करता येणार नाही. यामुळे शासन आणि राजकीय पक्षांकडून जलदगतीने निर्णय घेतले जात आहेत. मंत्रालयात आज सकाळपासूनच मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने, त्याआधीच निवडणुका होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांवर दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असून १५ नोव्हेंबर रोजी मतदान होऊ शकते, असे बोलले जात आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याचे संकेत मिळाले आहे. महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात जोरदार तयारी सुरू केली आहे. याचवेळी महायुती सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध शासन निर्णयांची मालिका जाहीर करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय पक्षांची तयारी आणि निवडणूक आयोगाच्या आगामी घोषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण होत आहे.