Vidhansabha Election : ‘लोकपोल’चा दावा; विधानसभेत महाविकास आघाडीलाच बहुमत, जाणून घ्या कोणाला किती जागा…?
Vidhansabha Election : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज लोकपोलच्या ताज्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार सत्ताधारी महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील. तर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळण्याची शक्यता आहे. लोकपोलने जाहीर केलेल्या जनमत चाचणीमध्ये नागरिकांचा कल मविआच्या दिशेने झुकलेला दिसत असल्याने महायुतीसाठी तो मोठ्ठा धक्का मानला जात आहे.
Vidhansabha Election: Claim of ‘Lokpol’; Majority of Mahavikas Aghadi? Find out how much space anyone has…?
लोकपोलने त्यांच्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवर शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळेल. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीला 115 ते 128 जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय, अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांना 5 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वेक्षणात ग्रामीण भागातील असंतोष, महागाई, भ्रष्टाचार, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश या मुद्यांवर मतदारांनी भाजपविरोधात कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, महाराष्ट्रातून बाहेर जाणारे औद्योगिक प्रकल्प आणि बेरोजगारी हे मुद्देही महत्त्वाचे ठरले आहेत. या सर्वेक्षणानुसार, मतदारांनी राज्याच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त केली आहे, ज्याचा महायुतीला फटका बसू शकतो. विशेष म्हणजे लोकपोलच्या अंदाजानुसार काँग्रेस हा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो.
लोकपोलने विभागनिहाय व्यक्त केलेला अंदाज असा
■ उत्तर महाराष्ट्र : 47 जागांपैकी 20 ते 25 जागा महायुतीला, तर महाविकास आघाडीला 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज.
■ ठाणे-कोकण : 39 जागांपैकी 25 ते 30 जागा सत्ताधारी महायुतीला, तर 5 ते 10 जागा महाविकास आघाडीला मिळतील. 1 ते 3 इतर आमदार किंवा अपक्ष.
■ मुंबई : 36 पैकी 10 ते 15 जागा महायुतीला तर 20 ते 25 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात.
■ पश्चिम महाराष्ट्र : 58 पैकी 20 ते 25 जागा महायुतीला, तर 30 ते 35 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. 1 ते 5 जागा इतर पक्षांना मिळू शकतील.