Vidhansabha Election: मोठी अपडेट; महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात…!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिले संकेत

Vidhansabha Election : निवडणूक आयोगाने सण आणि उत्सवांचे कारण देऊन महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकल्याने सर्वच राजकीय पक्षांचा हिरमोड झालेला आहे. निवडणुकीची तारीख आता केव्हा जाहीर होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होईल, त्याविषयी ताजे भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण सुद्धा आले आहे.

Vidhansabha Election: Big update ahead; Assembly elections in the state in the month of November…!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघात दिलीप लांडे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत विधानसभेच्या निवडणुकीबाबत महत्वाचे संकेत दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानाने राज्यातील आगामी राजकीय परिस्थितीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झाल्यास राज्यातील सर्व प्रमुख पक्ष आणि नेते आपापल्या तयारीला लागतील. निवडणूक आयोगाने विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीबाबतच्या नव्या विधानानंतर पुन्हा एकदा सर्वांमध्ये उत्साह संचारण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून खलबते

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ठाकरे गटाने सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून आपला आग्रह मागे घेतला आहे. ठाकरे गटाने आता या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतली असून, त्यांनी राज्यातील भ्रष्ट सरकार हटवणे हे आपले सर्वोच्च उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. शरद पवार व नाना पटोले यांच्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनीही त्या दोघांच्या सुरात सूर मिसळला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button