Vidhansabha Election : मोठी बातमी; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते ‘या’ तारखेला…!

Vidhansabha Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. तत्पूर्वीच महाविकास आघाडीसह महायुतीकडून ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले जात असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील आटोपण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील महिन्यात ९ ते १० ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Vidhansabha Election : Big News; Assembly elections in Maharashtra may be announced on ‘this’ date…!

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या २६ नोव्हेंबरला संपत असल्याने, राज्यात लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांतच निवडणुकीची तारीख आणि आचारसंहितेचा अंमल जाहीर होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता, यावेळी निवडणुकीची घोषणा काहीशी उशीरा होत असल्याचे दिसत आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्यात आल्या होत्या, मात्र यावेळी हरियाणात निवडणुकीची घोषणा आधीच झाली असून प्रचारही जोरात सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही. निवडणूक आयोगाकडून लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी शक्यता आहे, कारण विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक आहे.

सन २०१९ मध्ये २१ ऑक्टोबरला पार पडली होती विधानसभेची निवडणूक

सन २०१९ मध्ये २१ सप्टेंबरला आचारसंहिता आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली होती. २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यावेळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेवून आचारसंहिता किंवा निवडणूक ०९ किंवा १० ऑक्टोबरला घोषित केली, तर दोन टप्प्यात १० नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबरला मतदान होऊ शकते. निवडणुकीचा निकाल तीन ते चार दिवसांनी म्हणजे १५ किंवा १६ नोव्हेंबरला लागू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button