जळगावात दिव्यांग बांधवांना खासदार उन्मेश पाटील यांचे हस्ते बॅटरीवरील तीन चाकी सायकलींचे वाटप…!
Unmesh Patil : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा (एडीआयपी) योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंम्को) कानपूर यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या वतीने जळगाव तालुक्यातील पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या 245 दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वितरीत करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे महानगरअध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे,लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, युवा मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष महेश पाटील, रोटरीचे गनी मेनन, रेडक्रॉसचे सुभाष साखला, भाजप तालुकाध्यक्ष ऍड. हर्षल चौधरी, जिल्हा अपंग पुनर्वसन अधिकारी गणेश कर, जि.प.चे समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, एलिंम्कोचे डॉ.किरण पावरा, दिव्यांग आघाडी महानगराध्यक्ष गणेश वाणी, मुकुंद गोसावी, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, योगेश पाटील, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांनी प्रास्ताविक केले. महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे मनोगत व्यक्त केले. दिव्यांग आघाडी महानगराध्यक्ष गणेश वाणी यांनी आभार मानले.
दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद
लाभार्थी प्रविणसिंह राजपूत म्हणाले की, “गेल्या वर्षभरापूर्वी जळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये पूर्व तपासणी शिबीर झाले होते.त्यामुळे साहित्य कधी भेटेल ही उत्सुकता होती. वेळोवेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांना मी फोन करून विचारत होतो. त्यांनी विश्वास दिला होता की तुमची तपासणी झाली असेल तर तुम्हाला साहित्य लवकरच मिळेल आज हे साहित्य मिळाल्याने मी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आभार व्यक्त करतो.”