खासदार उन्मेश पाटील यांनी कृषी विभागात जाऊन घेतला केळी पिकविम्याचा आढावा
Unmesh Patil : जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यातील केळी पिकविम्याची सद्यस्थिती तसेच कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका आदी पिकांच्या विम्याचा आढावा शुक्रवारी (ता.15) कृषी विभागात जाऊन घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा देखील केली.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, युवा मोर्चा जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष निर्दोषदादा पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्रभाऊ चौधरी ,तंत्र अधिकारी दीपक ठाकूर, ज्ञानेश्वर महाले आदी मान्यवर उपस्थित होते. केळी पिकविमा जिल्हास्तरीय समितीने मंजुर केलेल्या 6686 शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची सद्यःस्थिती खासदार श्री. पाटील यांनी जाणून घेतली तेव्हा सदरचे प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे सादर केलेले असून जिल्हास्तरावरील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती समोर आली.
याशिवाय खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी इ. पिकांच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईबाबत चर्चा केली. सदरचा पीक प्रयोगाचा अहवाल देखील कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आलाआहे. त्याबाबत देखील तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार श्री. पाटील यांनी दिले.