चाळीसगाव तालुक्यातील दिव्यांगांना आज कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप
Unmesh Patil : भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंम्को) कानपूर यांच्यामार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून व खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी चाळीसगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांची पूर्व तपासणी व नोंदणी झाली होती. त्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने शनिवारी (ता. 09) सकाळी दहाला वाटप करण्यात येणार आहे.
चाळीसगाव शहरातील भडगाव रस्त्यावरील अंधशाळा मैदानावर पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या फक्त चाळीसगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सदर शिबिरात कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात येणार आहे. जळगाव लोकसभा क्षेत्रातील पाचोरा व भडगाव येथेही रविवारी (ता.10) सकाळी दहा वाजता तर इतर तालुक्यांवर सदर शिबिर टप्याटप्याने राबविण्यात येणार आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांनी शिबिरास येताना पूर्व नोंदणीची पावती तसेच आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावे, असेही कळविण्यात आले आहे.