जळगाव जिल्ह्याचे केळी उत्पादक शेतकरी हेक्टरी 43,500 रूपये नुकसान भरपाईस पात्र

जळगाव टुडे | हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हेक्टरी सुमारे 43 हजार 500 रूपये नुकसान भरपाईस पात्र ठरले आहेत. 1 मे 2024 ते 31 मे 2024 या कालावधी सलग 5 दिवस 45°C किंवा त्यापेक्षाही जास्त तापमान होते. त्यामुळे संबंधित सर्व शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले आहेत, अशी माहिती जळगावचे माजी खासदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) तसेच करण पाटील (Karan Patil) यांनी दिली आहे.

माजी खासदार उन्मेश पाटील तसेच करण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुकानिहाय नुकसान भरपाईस पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे आहेत. त्यातील विमाधारक केळी उत्पादक शेतकरी विमा योजनेतून मिळणाऱ्या भरपाईला पात्र ठरले आहेत.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई संदर्भात माहिती देताना माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील

केळी पीकविमा भरपाईस पात्र मंडळे
अमळनेर : अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे.
भडगाव : भडगाव, कोळगाव.
चाळीसगाव : खडकी बुद्रुक, शिरसगाव.
धरणगाव : धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह.
जळगाव : असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा.
पाचोरा : कु-हाड बुद्रुक, पाचोरा.
पारोळा : बहादरपूर, पारोळा, शेळावे, तामसवाडी.
भुसावळ :वरणगाव.
चोपडा : चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बुद्रुक, लासुर.
जामनेर : जामनेर,नेरी बु.,शेंदुर्णी.
मुक्ताईनगर : कुऱ्हा, मुक्ताईनगर.
रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु.,रावेर, सावदा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button