छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने चाळीसगाव शहर दुमदुमले

खासदार उन्मेशदादा पाटील यांचेसह शेकडो मावळ्यांची बाईक रॅली

Unmesh Patil : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या जयजयकाराने अख्खे चाळीसगाव शहर दुमदुमुन निघाले. खासदार उन्मेशदादा पाटील यांचेसह शेकडो मावळ्यांच्या बाईक रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

शिवजयंती निमित्त चाळीसगाव येथील कॉलेज चौकातील शक्ती ग्रुपच्या वतीने आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो मावळ्यांनी हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवा रुमाल, भगवी टोपी परीधान करीत बाईक रॅलीत सहभाग घेतला. सुरुवातीला खासदार उन्मेशदादा पाटील,उमंग सृष्टी परिवाराच्या अध्यक्षा सौ.संपदाताई पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. खासदार श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थित साऱ्या शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे सादर केले. धुळे रोड कॉलेज चौकांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, अभिनव शाळेच्या मार्गावरून खरजई नाक्यावरून दयानंद हॉटेल, घाट रोड,अहिल्याबाई होळकर चौक, रांजणगाव दरवाजा, सदर बाजार, जुनी नगरपालिका छत्रपती शिवाजी घाट पोलीस स्टेशन मार्गे मार्गस्थ झालेल्या रॅलीचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात विसर्जन करण्यात आले.

यावेळी प्रतिभा चव्हाण, विधानसभा निवडणूक प्रमुख नगरसेवक घृष्णेश्वरतात्या पाटील, नगरसेवक संजयआबा पाटील, नगरसेविका विजयाताई प्रकाश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. बाईक रॅलीच्या यशस्वीतेसाठी रोहित पाटील, धीरज पवार, भैय्या नवले, निलेश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button