जळगावचे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार ?

Jalgaon Today : भारतीय जनता पार्टीने मुंबईत गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, उत्तर-मध्य मुंबईत अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याच जागेसाठी जळगावचे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. किंबहुना भाजपाकडून आजच त्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता देखील आहे.

उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महायुतीदेखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारीला लागली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत तीन जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी दोन जागांवर भाजपने उमेदवार देखील दिले आहेत.त्याठिकाणी विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्यानंतर आता पूनम महाजन यांचेही तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. भाजप महाजन यांच्या जागेवर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. त्याबद्दलची घोषणा आजच केली जाऊ शकते.

उज्ज्वल निकम मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे रहिवासी आहेत. पण आतापर्यंत त्यांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईशी त्यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असो किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला, निकम यांनी महत्त्वाचे खटले हाताळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ते सुपरिचित चेहरा आहेत. निकम यांच्या नावाची घोषणा आज महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा करू शकतात.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button