सुप्रिया सुळे थेट अजितदादांच्या घरी…मात्र भेटल्या नाही भाऊ आणि वहिनीला !
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या दिवशी बारामती मतदारसंघात तणावपूर्ण वातावरण असतानाही खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी धावती भेट दिली होती. तशीच भेट आज रविवारी (ता.०७) देऊन सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे यावेळी अजितदादा व वहिनी सुनेत्रा पवार हे दोघे घरात असुनही त्यांना न भेटताच त्या घराबाहेर पडल्या.
Supriya Sule
बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे मतदान ७ मे रोजी होते. त्याच दिवशी मतदान करून सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थनी गेल्या होत्या. मात्र, त्यावेळी मी माझ्या काकींना म्हणजे अजितदादांच्या आईला भेटायला आले होते, असे कारण त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले होते. आताही काटेवाडीच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्या काकी आशाताई पवार यांना भेटायला आले होते, असेच कारण दिले आहे. बारामतीमधील काटेवाडीत अजित पवार यांचे निवासस्थान आहे. याच ठिकाणी अजित पवार तसेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या आई आशाताई पवार एकत्र राहतात.
Supriya Sule
काटेवाडीतील घर हे कुठल्याही एका व्यक्तीचे घर नाही. ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचे घर आहे. त्यामुळे त्या घरावर आमचा सगळ्यांचा हक्क आहे. माझ्या बाकीच्या भावंडांनाही वाईट वाटतं की हे आपले घर आहे. माझ्या आशाकाकी तिथे राहतात. मी जन्मापासून या घरात राहिली आहे. मी आशाकाकींना नमस्कार करायला आले होते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटल्या. दरम्यान, अजित पवार आणि सुनेत्रा पवार जेवणाच्या कार्यक्रमात व्यग्र होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. सगळे गडबडीत होते. कुणाशी काही चर्चा करायचा काही विषयच आला नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटून गेल्यानंतर आज सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात त्यांनी घरी जाऊन भाऊ आणि वहिनीची भेट घेतली नाही. त्यामुळे जास्तच चर्चा झाली.