पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील स्टार्टअप कल्चर जळगावमध्ये रूजवून रोजगार वाढीला देणार चालना
लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची तरूणाईला ग्वाही
Smita Wagh : “भविष्यातील मोठी संधी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सध्या देशात स्टार्टअप कल्चर रुजविण्यावर भर देण्यात येत आहे. जळगावमध्येही त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करून रोजगार वाढीला चालना देण्यात येईल; किंबहूना जळगावला स्टार्टअप हब बनविण्यासाठी आगामी काळात विशेष पाठपुरावा केला जाईल,” अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीच्या जळगावमधील लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी तरूणाईला दिले आहे.
जळगावमध्ये स्टार्टअप्स वाढीच्या संदर्भात जळगाव स्टार्टअप गृपच्या सदस्यांसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’केल्यानंतर स्मिता वाघ बोलत होत्या. स्टार्टअप ही संकल्पना आता पुणे-मुंबई किंवा अन्य महानगरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. जळगाव जिल्ह्यातही अनेक नवीन स्टार्टअप सुरु होत आहेत आणि नव्या स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होताना दिसते आहे. वाढती रोजगार संधी लक्षात घेता आगामी काळात जळगावला स्टार्टअप हब बनविण्यास मोठा वाव देखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात स्टार्टअप कल्चर वाढत आहे. त्यात जळगावची उत्साही तरुणाई देखील मागे नाही, हे पाहून खूप आनंद झाल्याची भावना स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. ‘स्टार्टअप पे चर्चा’ या कार्यक्रमात जळगावमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजविण्यासाठी तसेच वाढण्यासाठी कोणत्या सोयी-सुविधांची आवश्यकता आहे, त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.
यावेळी जळगावमधील स्टार्टअप फाऊंडर्संनी त्यांच्याकडील नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांची माहिती देत भविष्यात त्यास चालना देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याबाबतच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या. श्री एजन्सीमध्ये झालेल्या या चर्चेत जळगाव स्टार्टअप ग्रृपचे अजिंक्य तोतला, आर्यन मणियार, डॉ. युवराज परदेशी, निखिल जाधव, योगेश चौधरी, तेजस पाटील, तुषार भांबरे, रजत भोळे, निखिल पाटील, मकरंद डाबिर, हरेक सोनी, अभिषेक राकेचा, अकुंर साळूंखे, राहूल जैन, आशुतोष रांगा, निकुंज रांगा, कुश फुले, अक्षय पाटील, मौलिक कुमत, लोकेश काबरा, आकाश पाटील, प्रतिक वरयाणी, अर्चना महाजन यांच्यासह आदी सदस्य सहभागी झाले होते.