विद्यार्थी परिषद ते विधान परिषद….जळगाव लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांचा राजकीय प्रवास !

Smita Wagh : भारतीय जनता पार्टीने धक्कातंत्र वापरून जळगावमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पर्यायाने भाजपाच्या विचारधारेशी जुळलेल्या श्रीमती वाघ यांनी यापूर्वी जळगावच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय महाराष्ट्र विधान परिषदेच्या त्या सदस्य राहिल्या आहेत. त्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास अतिशय थक्क करणारा असा राहिला आहे.

कौटुंबिक माहिती :
● नाव : श्रीमती स्मिता उदय वाघ
● जन्म ता. : २६/०३/१९६८
● माहेर : अंदरसुल, ता. येवला, जि. नाशिक
● शिक्षण : बी. ए. (मानसशास्त्र)
● मूळगाव : डांगर बु।।, ता. अमळनेर, जि. जळगाव
● निवास स्थान : न्यू. प्लॉट, चिकाटे गल्ली, अमळनेर
● ऑफीस : ३३/२२ लक्ष्मी भुवन, वरद ऑफसेट, गांधी नगर, जिल्हा पेठ, जळगाव
● सासरे : स्व. तात्यासाो. भिकनराव माधवराव वाघ – २५ वर्षे सरपंच (डांगर बु.)
● वडिल : स्व. रावसाहेब जहागिरदार (सभापती, पं.स. येवला)

सामाजिक व राजकीय वाटचाल :
● १९८५ ते १९९०- जळगाव शहरात अभाविपच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनापासून शैक्षणिक चळवळीत प्रमुख योगदान.
● कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष.
● राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक बांधिलकी व संघ परिवाराच्या कार्यात सहभाग.
● २ मे १९९० रोजी श्री उदय भिकनराव वाघ यांच्या समवेत विवाहबद्ध.
● उद्यमी महिला पतसंस्थेच्या संचालिका म्हणून आर्थिक क्षेत्रात महिला कल्याणासाठी कार्य.
● १९९२- भाजपाच्या कार्यात सक्रिय सहभाग.
● १९९६-९७ मध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘उत्कृष्ट उद्योजिका’ पुरस्काराने गौरव.
● २००२ ते २०१५ पर्यंत सलग तीनवेळा सदस्या- जिल्हा परिषद जळगाव.
● २००३ – जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा जळगाव.
● २००५- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट निवडणुकीत जळगाव, धुळे व नंदुरबारमधून सर्वाधिक मतांनी विजयी.
● २००६ ते २००८- प्रदेश चिटणीस, भाजपा महाराष्ट्र.
● २००९- राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्या, भाजपा.
● २००९ ते २०१२ पहिल्या महिला अध्यक्षा, जिल्हा परिषद जळगाव.
● २०१२ ते २०१५- प्रदेशाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र.
● २०१७ पासुन प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र.
● २०१५ ते २०२२- महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (आमदार).
● २०१८ पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सिनेट सदस्य.
● २०२२ पासुन भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
● २०२३ फेब्रुवारी पासून संचालक, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ.
● संपादिका- साप्ताहिक जनसत्याग्रही.
● गेल्या २५ वर्षापासून प्रिंटींग (ऑफसेट) व्यवसायात कार्यरत.
● श्री गणेशा प्रिंटर्स आणि वरद ऑफसेट या व्यावसायिक प्रतिष्ठानांद्वारे ग्राहक सेवा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button