Shivsena UBT : शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच राहणार; धनुष्यबाण चिन्ह मात्र गोठवले जाणार !
Shivsena UBT : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना सर्वोच्च न्यायालयाला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर तातडीने निकाल देणे आता गरजेचे झाले आहे. दरम्यान, येत्या 14 ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच राहणार असून, धनुष्यबाण चिन्ह मात्र गोठवले जाणार आहे.
Shivsena UBT: Shiv Sena will remain with Uddhav Thackeray; But the arrow icon will be frozen!
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल. किंबहुना विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्वोच्च न्यायालयाला तो निकाल लावावा लागेल. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाची नाचक्की होईल, असेही वक्तव्य ठाकरे गटाचे वकील सरोदे यांनी केले आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणूनबुजून लांबणीवर टाकले जात आहे का? हा प्रश्न काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. तशात असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीच्या तारखेवरून उद्धव ठाकरेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी चांगलेच सुनावले. ‘तुम्ही इथे येऊन बसून तुम्हाला कोणत्या तारखा हव्यात आहेत, हे कोर्ट मास्तरला का सांगत नाही?’, अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावले. शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाच्या आमदाराला अपात्र ठरवलेले नाही.