शेरास भेटला सव्वाशेर ! एरंडोल तालुक्यातील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडले मोठे खिंडार
Shivsena Eknath Shinde : एरंडोल-पारोळा तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील आणि जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एरंडोल तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात बुलडाणा येथे जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये एरंडोलचे माजी नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील (पहिलवान), राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू चौधरी, शिवसेना उबाठाचे शहर सरचिटणीस अतूल मराठे यांचाही समावेश होता.
दरम्यान, एरंडोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी (कार्यक्षेत्र- पारोळा, एरंडोल, अमळनेर, चोपडा) नियुक्ती करण्यात आली. महायुतीचे बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर, बुलडाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विलास पारकर व अमोल पाटील यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, तालुका संघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख रवी जाधव, माजी तालुका प्रमुख बबलू पाटील, माजी नगरसेवक आनंद दाभाडे, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, शहर संघटक मयुर महाजन, टोळीचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील, बांभोरीचे ग्रामपंचायत सदस्य मयुर पाटील, कासोदा येथील अमोल पवार, सोनु शेलार यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटात यांचा जाहीर प्रवेश
एरंडोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एरंडोल शहराध्यक्ष बबलू चौधरी, शिवसेना उबाठा शहर सरचिटणीस अतुल मराठे तसेच भानुदास नथ्थू आरखे, पंकज दत्तात्रय पाटील, विलासआण्णा भोई, बाळाभाऊ पहेलवान, अनिल पंडित पाटील, आरीफ मिस्तरी, शाम जाधव, अमोल तांबोळी, दिलीप चौधरी, ऋषिकेश गोरख महाजन, अनिल रमेश आरखे, अनिल भोई, संजय कुंभार, विष्णु सोनवणे, अनिल गंभीर भोई, दिलीप आत्माराम सोनवणे, जावेद अहमद सफियोद्दिन खाटिक, बंटी शिरवाणी, विनीत महाले, शरद सुर्यवंशी, दिलीप सोनवणे, नरेश सुर्यवंशी, भैय्याभाऊ लोहार, सुदर्शन रायगडे, श्रावण मोरे, संजय विठ्ठल कुंभार, दिलीप पाटील फौजी, नगराज दशरथ पवार, भिका सीताराम भिल, विष्णू हरचंद सोनवणे, संजय भिका पवार, प्रमोद सखाराम सोनार, विक्रांत साळी, मयूर चौधरी, मयूर जावळे, निलेश चौधरी, अमोल धोबी, प्रमोद जाधव, प्रविण भोई, प्रदीप सूर्यवंशी, अजय भोई, राहुल देशमुख, साहेबराव चौधरी, दिनेश पाटील, निलेश सूर्यवंशी, मुकेश भोई, ईश्वर पाटील, जय बोरसे, विशाल शिंपी, आण्णा पाटील, राहुल पाटील, शुभम सोनवणे, भूषण भोई, किरण भोई, गणेश भोई, नरेश भोई, किशोर पाटील, अक्षय महाजन, सुशील भोई, गबरू भोई, यशवंत भोई, अमोल भोई, सुनील भोई, कुणाल पाटील, दीपक भोई, समाधान भोई, भुरा भोई, योगेश भोई, विशाल चौधरी, रविंद्र चौधरी, पिनोल भोई, संजय भोई, गणेश पाटील, बंटी पेहलवान, शुभम पाटील, गोविंदा पाटील, मयूर सोनवणे, निखील महाजन, बंटी भोई, समाधान पाटील, हॅप्पा पहेलवान, पियुष साळी.