शिक्षक मतदारसंघ निवडणूक…जळगाव जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत सरासरी ६१.१३ % मतदान !

जळगाव टुडे । नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज बुधवारी जळगाव जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ६१.१३ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण २० मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली असून, एकूण १३ हजार १२२ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ( Shikshak Matdarsangh Election )

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ६०२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले असून, त्यात ५८२७ पुरूष आणि २१९५ महिला मतदारांचा समावेश आहे.

केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी (दुपारी तीनपर्यंत)
तहसील कार्यालय चोपडा- ५९.७५ टक्के, तहसील कार्यालय यावल- ६९.२७ टक्के, तहसील कार्यालय रावेर- ५२.१८ टक्के, तहसील कार्यालय मुक्ताईनगर- ५८.३७ टक्के, तहसील कार्यालय बोदवड- ८४.२४ टक्के, डीएस हायस्कूल भुसावळ- ६९.६२ टक्के, डीएस हायस्कूल भुसावळ- ६६.६६ टक्के, आर.आर. विद्यालय, जळगाव- ६८.०२ टक्के, आर.आर. विद्यालय, जळगाव- ६२.४० टक्के, भाऊसाहेब लाठी विद्यामंदीर, जळगाव- ५२.२८ टक्के, तहसील कार्यालय धरणगाव- ७३.२९ टक्के, तहसील कार्यालय अमळनेर- ५१.२८ टक्के, राजसारथी मिटींग हॉल, अमळनेर- ५३.६६ टक्के, तहसील कार्यालय, पारोळा- ६१.९४ टक्के, तहसील कार्यालय एरंडोल- ७५.० टक्के, तहसील कार्यालय भडगाव- ५३.१६ टक्के, नानासाहेब चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव- ६४.२१ टक्के, तहसील कार्यालय पाचोरा- ५५.२६ टक्के, जिल्हा परिषद शाळा, जामनेर- ५७.१७ टक्के

WhatsApp Group

Related Articles

Back to top button