Sharad Pawar : मराठा, ओबीसी, धनगर समाज आरक्षणाच्या वादावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य…!
Sharad Pawar : राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाज आरक्षणाचा वाद विकोपाला गेलेला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. सध्याची आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ही फारच कमी आहे, ती ७५ टक्क्यांपर्यंत वाढवायला हवी. जर केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही श्री.पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar’s big statement on Maratha, OBC, Dhangar community reservation dispute…!
शरद पवार यांच्या या विधानामुळे राज्यातील आरक्षणाच्या चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. केंद्र सरकार या मुद्द्यावर काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ५० टक्क्यांच्या मर्यादेवर समाधान होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आणि या मर्यादेत वाढ करून ती ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याची मागणी देखील केली आहे.
संसदेत कायदेशीर दुरुस्ती करायला काय हरकत आहे ?
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, की “सध्याच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेत बदल न करता पुढे जाता येणार नाही. जर समाजाला योग्य आरक्षण द्यायचे असेल, तर त्यासाठी संसदेत कायदेशीर दुरुस्ती करावी लागेल. दुरुस्ती करायला काय हरकत आहे? आरक्षण ५० टक्क्यांवरून थेट ७८ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या. शरद पवार पुढे म्हणाले, की “आरक्षणात २५ टक्क्यांची वाढ करून ज्यांना आरक्षण मिळालेले नाही, त्यांचा समावेश त्या अतिरिक्त टक्क्यांमध्ये करता येईल. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि संसदेत विधेयक आणावे. राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देईल.”