शरद पवार ‘या’ मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना देणार साथ

Sharad Pawar : “वाढती बेरोजगारी लक्षात घेता राज्यात रोजगार निर्मितीला चालना देण्याची मोठी गरज आहे. त्याकडे सरकारने वेळीच लक्ष दिल्याने मी त्यांचे प्रथम आभार मानतो. त्यासाठी राजकारण बाजुला राहिले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची नेहमीच साथ राहील”, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी बारामती येथे आज शनिवारी (ता.02) जाहीरपणे दिली.

बारामती येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या मैदानावर महायुती सरकारतर्फे नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे इत्यादी उपस्थित होते. “देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकारने तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो. आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे. आता विद्या प्रतिष्ठानमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरु होत आहे. राजकारण आपल्या जागी होत असते. पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू”, असे देखील त्यांनी बोलून दाखविले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button