पिपाणीमुळे तुतारीला फटका…शरद पवार आता मोठे पाऊल उचलणार !

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत दहापैकी ॉतब्बल आठ जागांवर उमेदवार निवडून आल्यानंतर राज्याच्या राजकारणात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आता दबदबा वाढला आहे. तरीही काही ठिकाणी तुतारीच्या विरोधात पिपाणीच्या चिन्हावर उमेदवार उभे राहिल्याने त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसलाच असून, त्यामुळे शरद पवारांनी निवडणूक आयोगाकडील पिपाणीच्या चिन्हावर आक्षेप घेतला आहे. तिथे न्याय न मिळाल्यास त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी त्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. ( Sharad Pawar )

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे विधानसभेची निवडणूक घोषीत होण्याआधीच त्यासंदर्भात निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा. अन्यथा या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शरद पवार गटाने पत्राद्वारे दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादीला पिपाणीच्या चिन्हामुळे सर्वाधिक फटका बसला. तेथील उमेदवार शशिकांत शिंदे हे फक्त ४५ हजार मतांनी पराभूत झाले, तर पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल ३७ हजार मते मिळाली. म्हणून राष्ट्रवादीने पिपाणी चिन्हावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटल्यानुसार तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणीच्या चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. त्याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. मात्र, त्याची कोणतीच दखल घेतली गेली नाही. म्हणून आम्ही पिपाणी हे चिन्ह वगळण्याची मागणी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याठिकाणी न्याय न मिळाल्यास प्रसंगी सुप्रीम कोर्टातही दाद मागण्यात येईल.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button