शरद पवारांच्या कुटुंबातील ‘हा’ एक तरूण बारामतीच्या राजकारणात झाला सक्रीय !

जळगाव टुडे । बारामतीमध्ये लोकसभेचे मतदान झाल्यानंतर विरोधी गटातील व पवार कुटुंबातील काही लोक दिसणार देखील नाहीत; ते कदाचित परदेशात जातील, अशी जोरदार टीका काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजितदादांच्या त्या टीकेला पवार कुटुंबातीलच एका तरूणाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल होऊन प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना थेट उत्तर देण्याची धमक दाखवणाऱ्या त्या तरूणाची अशा प्रकारे राजकारणात अचानक सक्रीय होण्याची सगळीकडे चर्चा देखील रंगली आहे. (Sharad pawar)

बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया एकदाची पार पडली आहे. मात्र, त्यानंतरही त्या मतदारसंघात अनेक धक्कादायक व खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत. तशात मतदानाला आठवडा उलटत होत नाही तेवढ्यातच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे राजकारणात अचानक सक्रीय झाल्याचे दिसून आले आहेत. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात पाय ठेवल्यानंतर युगेंद्र पवार यांनी स्थानिक कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. युगेंद्र पवार हे विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती तर आखत नाहीए, अशी शंका त्यामुळे उपस्थित होऊ लागली आहे.

“मी बारामतीचाच राहणारा आहे. जरी बाहेर कुणाला जायचे असेल तर त्याच्यात काही गैर नाही. गेल्या चार वर्षांपासून मी सोमवार ते गुरुवारच्या कालावधीत बारामतीत असतो. जनतेशी संपर्क वाढल्यामुळे लोकं आता मला येऊन भेटतात, असे बोलून युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला दमदार उत्तर देखील दिले आहे. जेव्हा मी सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत होतो, तेव्हा लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होती. बारामतीत पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि इतर अडचणी सोडवण्यासाठी तसेच लोकांना भेटण्याकरीता मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आलो आहे,” असेही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button