Sharad Chandra Pawar’s NCP : शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा पोळा लवकरच फुटणार; जळगाव जिल्ह्यात नेमकी कोणाला मिळणार उमेदवारी ?

Sharad Chandra Pawar’s NCP : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागविल्याची माहिती मिळाली आहे. येत्या पाच सप्टेंबरपर्यंत सर्व अर्ज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जमा केले जाणार असून, त्यानंतर उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते, त्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Sharad Chandra Pawar’s NCP hive will break soon; Who exactly will get candidacy in Jalgaon district?

महाविकास आघाडीच्या जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील जागांच्या वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोनृतीन मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटात ओढाताण सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व ११ मतदारसंघांसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. पक्षाकडून तीन पानांचा अर्ज इच्छुकांना भरण्यासाठी देण्यात आला आहे. याशिवाय प्रतिज्ञापत्र भरण्यास सांगितले गेले आहे. अर्ज भरून देताना संबंधितांना सुमारे १० हजार रूपये शूल्क देखील आकारण्यात येणार आहे. राखीव तसेच अल्पसंख्याक वर्गातील उमेदवारांना मात्र निम्मेच शूल्क लागणार आहे. संबंधितांना त्यांचे अर्ज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे भरून द्यावे लागणार आहेत.

‘या’ तिघांची उमेदवारी मानली जात आहे निश्चित

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, याविषयी पदाधिकाऱ्यांची मते जळगावात आयोजित मेळाव्यात जाणून घेतली होती. तेव्हा जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर, एरंडोल-पारोळा मतदारसंघातून डॉ.सतीश पाटील यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले होते. रोहिणी खडसे आणि विनोद तराळ यांनी मुक्ताईनगरसाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तराळ यांना थांबण्याच्या सूचना देऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रोहिणी खडसे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील व रोहिणी खडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

८ जागांसाठी १६ जण आहेत इच्छुक, नेमकी कोणाला मिळणार संधी ?

प्राप्त माहितीनुसार, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी विकास पवार, मंगला पाटील आणि अशोक लाडवंजारी यांनी उमेदवारीची अपेक्षा केली आहे. अमळनेर मतदारसंघासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील तसेच तिलोत्तमा पाटील व गिरीश निकम यांनी इच्छा व्यक्त केली आहे. चाळीसगाव मतदारसंघासाठी माजी आमदार राजीव देशमुख यांनी यावेळीही आपली तयारी असल्याचे सांगितले आहे. जामनेरच्या जागेसाठी डी.के.पाटील आणि प्रशांत पाटील यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चोपड्यातून डॉ.चंद्रकांत बारेला, ज्योती पावरा तसेच डी.पी.साळुंखे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. पाचोऱ्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांना उमेदवार देण्याची मागणी त्यांचे बंधू संजय वाघ यांनी केली आहे. भुसावळ मतदारसंघासाठी स्वाती भामरे आणि रावेरसाठी माजी आमदार अरूण पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button