Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत…!

खासदार संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य

Sanjay Raut : ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी गद्दारी केली होती, ते आमदार आता पुन्हा निवडून येणार नाहीत. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, हे सूत्र युतीत तरी फायदेशीर ठरत नाही. कारण दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून निवडणुकीत ठरवून जागा पाडल्या जातात. भाजपने अनेक वर्षे असेच राजकारण आमच्यासोबत केले, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे आज केले.

Sanjay Raut : MLAs who betrayed Thackeray will not be re-elected…!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज शुक्रवारी (ता.२३) दुपारी जळगाव शहरात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास उपस्थित राहण्यासाठी जळगावात आगमन झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला. महाराष्ट्रात सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे जवळचे काही कार्यकर्ते जो सांगतील तोच कायदा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात पोलिसांना घरगड्यासारखे वागवले जात आहे, असा गौप्यस्फोट सुद्धा राऊत यांनी केला. ही अशी परिस्थिती तेव्हा तयार होते जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल अराजकता निर्माण होते, असेही विधान खासदार संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, खासदार राऊत यांनी पोलिस महासंचालिकांवर तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. पोलिस महासंचालिका जाहीर पणे सांगतात, मी संघाची कार्यकर्ती आहे. मग त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. पोलिसांना संघ परिवाराशी जवळीक पाहून मोठी पदे देण्यात आली आहेत, असेही राऊत यांनी बोलून दाखवले. चंद्रशेखर बावनकुळे हे राजकारणातील वाया गेलेली केस आहे. स्वतःच्या मतदारसंघात महायुतीला कमी मतदान पडल्याने त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे, असे म्हणत संजय राऊतांनी बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button