मन्यारखेड्याच्या आगग्रस्तांना रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने दिली नवी उभारी

Rotary Club News : जळगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्यारखेडा गावात सोमवारी (ता.18 मार्च) लागलेल्या भीषण आगीत काही कुटुंबांचा संसार बेचिराख झाला होता. संबंधित आगग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने पुढाकार घेतला असून, त्यांना अन्न आणि कपड्यासारख्या आवश्यक बाबींची पूर्तता करून संकटावर मात करण्याची नवी उभारी देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. अजुनही खूप सेवा तिथे होऊ शकते. आपलाही एक मदतीचा हात पुढे येऊ द्या, असे आवाहन रोटरी क्लबच्या सदस्यांनी केले आहे.

मन्यारखेडा गावात लागलेल्या भीषण आगीनंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने तीन पीडित कुटुंबांना अन्न आणि कपड्यांसारख्या आवश्यक गोष्टींसह आर्थिक मदत करण्यासाठी घटनास्थळी जाऊन तत्परतेने पाऊल उचलले. प्रसंग वाईट असताना संकटात सापडलेल्या कुटुंबांना पाठबळ देण्यासाठी एकत्र काम केल्यामुळे रोटरी परिवाराची एकता आणि करुणा दिसून आली. रोटरी क्लबचे सामूहिक प्रयत्न अचानक ओढवलेल्या संकटामुळे हिंमत खचलेल्या आगग्रस्त कुटुंबांसाठी कठीण काळात नवी उभारी देण्याकरीता नक्कीच दिलासादायक ठरले. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे प्रेसिडेंट कल्पेश शाह, सेक्रेटरी दिनेश थोरात, खजिनदार रवींद्र वाणी, डॉ राहुल मयुर , संदीप मुथा, जतीन ओझा, अनिल शाह, साधना दामले, जितेंद्र अग्रवाल, संतोष अग्रवाल, अॕड.आर.व्ही. कुलकर्णी, अनिल साखला, प्राचार्य गोकुळ महाजन, सुनील बाफना, कल्पेश दोशी, समर्थसिंग पाटील यावेळी उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button