जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना आचारसंहितेचा बागुलबुवा न करता भरपाई द्या

ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर यांची मागणी

जळगाव टुडे । जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील केळी उत्पादकांना अति तापमानासह वादळी वारे व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळली असून, घरांची व पशुधनाचीही हानी झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तातडीने शिथिल करून संबंधित नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली आहे. ( Rohini Khadse )

ॲड.रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चिचखेडासीम, लहान मनूर, ऐनगाव चिखली येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना धीर दिला. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदारांसोबत देखील त्यांनी यावेळी चर्चा केली. आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगितले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.

याप्रसंगी शेतकरी रामदास पाटील, कैलास चौधरी, चिचखेडा सीमचे सरपंच पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, विनोद कोळी, रामराव पाटील, किरण वंजारी, श्‍याम सोनवणे, नईम बागवान, अतुल पाटील, दिलीप पाटील, शिरसाळ्याचे सरपंच शांताराम बोरसे, प्रवीण पाटील, अमोल बोरसे, प्रकाश पाटील, मनूरचे सरपंच अमोल हडपे, सुरेश धनगर, चिखलीचे सरपंच धनराज पाटील, अमोल सोनवणे, विकास पाटील, प्रकाश वाघ, लीना वाघ आदी उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button