बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गासाठी रक्षा खडसेंनी घेतली नितीन गडकरींची भेट !

जळगाव टुडे । प्रस्तावित बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरण हे मुक्ताईनगर तालुक्यातून न करता आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून करावे. याशिवाय सदर महामार्गाची देखभाल दुरुस्ती तत्काळ पूर्ण करावी, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी रावेरच्या खासदार व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांनी आज बुधवारी (ता. २६) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.

रक्षा खडसे यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरण मंजूर झाले असून भूसंपादनाच्या बाबतीतही नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते. मात्र, हा महामार्ग पूर्वीच्या मार्गाने न करता मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्याअनुषंगाने प्रस्तावित महामार्गाचे काम पूर्वी प्रमाणेच करावे, या मागणीचे निवेदन रक्षा खडसे यांनी नितीन गडकरी यांना दिले.

तसेच सदर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्यांच्या प्रयत्नाने सुमारे ६१ कोटी निधी मंजूर असून, ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम संथ गतीने होत आहे. सध्या तर काम बंदच आहे. त्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन देखभाल व दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची किंवा ठेकेदार बदलण्याची मागणी देखील रक्षा खडसे यांनी केली. केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी त्याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करणेबाबतचे आश्वासन त्यांना दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button