रक्षा खडसे यांना अजुनही कसा बसत नाही, केंद्रीय मंत्रि‍पदावर विश्वास ?

जळगाव टुडे । लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी नुकतीच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्या खात्याचा पदभार घेऊन त्यांनी प्रत्यक्ष कारभार पाहण्यास सुरूवात देखील केली आहे. दरम्यान, तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर थेट केंद्रात मंत्रि‍पदाची जबाबदारी मिळेल, यावर माझा अजुनही विश्वास बसत नाही. तसेच मंत्रि‍पदाचा आपण कधी विचारच केला नव्हता, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. ( Raksha Khadse)

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर रक्षा खडसे लगेचच दिल्लीकडे रवाना झाल्या होत्या. तिथे गेल्यानंतर त्यांची मंत्रि‍पदाची लॉटरी लागली. सर्व काही स्वप्नवत घडल्यानंतर आज शनिवारी (ता.15) त्यांचे भुसावळच्या रेल्वे स्थानकावर आगमन झाले. तिथे रावेर लोकसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रसंगी त्यांचा जयघोष देखील करण्यात आला.

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ?
“देशातील युवकांसाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम कसे करता येईल, त्याकडे माझे लक्ष राहील. युवकांची ताकद आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कशी वापरता येईल, या दृष्टीने सुद्धा मला काम करायचे आहे. खेळामध्ये भारत देश आता अनेक विक्रम करीत आहे. ऑलिंपिकमध्येही आपले खेळाडू चमकू लागलेले आहेत. पुढील महिन्यात त्या स्पर्धा होणार आहे, त्यासाठी आपला भारतीय संघ रवाना होणार आहे. आपल्या देशाचे जास्तीतजास्त खेळाडू ऑलिंपिकच्या स्पर्धेत चमकले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button