रक्षा खडसेंनी स्वीकारला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार…!

जळगाव टुडे | रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर थेट केंद्रात मंत्रि‍पदाची संधी रक्षा खडसे यांना मिळाली आहे. दरम्यान, श्रीमती खडसे यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांनी देशातील युवा खेळाडुंच्या मागील कामगिरीचे मूल्यमापन करून त्या आधारे भारतात एक स्पोर्टींग हाऊस बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील दिली. यामाध्यमातून त्यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कार्याची चुणूक देखील दाखवली. (Raksha Khadse)

रक्षा खडसे यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची जुनी मैत्रिण माजी खासदार प्रीतम मुंडे यांनीही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. आजच्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी असल्याचेही प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच एक खास व्हिडीओ देखील त्यासाठी शेअर केला आहे. मी मंत्री झालेले असले तरी संसदेत प्रीतम मुंडे सोबत नसताना मला रडूच कोसळल्याचे रक्षा खडसे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनीही रक्षा खडसे यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावरील पोस्टमध्ये उजाळा दिला आहे.

मैत्रिणीबद्दल काय म्हणाल्या प्रीतम मुंडे ?
गेली 10 वर्ष खूप काही देऊन गेली…बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू रक्षा; आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे….पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या….10 वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण…संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो, असेही माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button